चासकमान धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पाचही दरवाजे बंद; शिरूरसाठी कालव्यातून आवर्तन

पाचही दरवाजे बंद; शिरूरसाठी कालव्यातून आवर्तन
चास - चासकमान धरणाच्या (ता. खेड) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून, धरणाचे उघडलेले पाचही दरवाजे बंद करण्यात आले असून, कालव्याद्वारे 550 क्‍युसेक; तर नदीपात्रात 300 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सद्यःस्थितीत 98.21 टक्के (8.40 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी वाढही मंदावली आहे. पाऊस जवळपास पूर्णपणे थांबला आहे. धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात लख्ख सूर्यप्रकाश आहे. चालू वर्षी 21 जुलै रोजी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात येऊन 5990 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात आला होता. त्यानंतरही आवक वाढत गेल्याने 23 रोजी सुमारे 22 हजार 295 क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यानंतर अनेकदा पाणीसाठा कमी- जास्त होत राहिल्याने धरणातून टप्प्याटप्प्याने कमी वा जास्त प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे धरणाचे पाचही दारे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. शिरूर तालुक्‍याची पाण्याची गरज पाहता धरणातून कालव्याद्वारे 550 क्‍युसेकने आवर्तन सुरू आहे.

Web Title: chas pune news chaskaman dam rain slow