चासकमान धरण भरण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

चास - चासकमान (ता. खेड) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. केवळ ४४ तासांत धरणातील पाणीसाठा २५ टक्के वाढून ६४.२६ टक्के (५.८२ टीएमसी) झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास एक ते दोन दिवसांतच धरण शंभर टक्के भरणार आहे.

भीमा नदीवर असणाऱ्या चासकमान धरणात केवळ दोन दिवसांत २५ टक्के पाणीसाठा वाढला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात १४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केवळ ३८.९६ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने केवळ ४४ तासांत हा साठा ६४.२६ टक्‍क्‍यांवर पोचला. पावसाचा जोर कायम असून, धरणात २७ हजार २७२ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. 

शिरूर तालुक्‍याची पाण्याची गरज पाहता धरणातून कालव्याद्वारे सोमवारपासून (ता. १६) ४०० क्‍युसेकने आवर्तन सोडण्यास सुरवात झाली आहे. कालव्यातून आवर्तन सोडल्याने धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला असून, एका तासाला १.८ मेगावॉट विजनिर्मिती सुरू झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरण एक ते दोन दिवसांत शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाईल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सहायक अभियंता अशोक मुरूडे व शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी केले आहे.

Web Title: Chasakman Dam water rain