चासकमानचा साठा पन्नास टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

चास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी झाला आहे. 

चास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी झाला आहे. 

या वर्षी पाऊस कमी झाला असला तरी धरण शंभर टक्के भरले होते. शिरूर तालुक्‍यात पाऊस न झाल्याने पावसाळ्यातच शिरूरसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी (२०१७) धरण व परिसरात ११४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. डिसेंबरच्या १६ तारखेस धरणात ९३.२९ (७.६ टीएमसी) टक्के पाणीसाठा होता. या वर्षी धरण परिसरात ६४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात आज ५०.७० टक्के (३.८ टीएमसी) पाणी शिल्लक आहे. 

कालवा नियोजन समितीच्या बैठकीत आवर्तन ‘टेल टू हेड’ या पद्धतीने सोडण्याचे ठरलेले होते. मात्र शिक्रापूरपर्यंत पाणी गेल्यावर आवर्तन ‘हेड टू टेल’ पद्धतीने करण्यात आले. ‘टेल’कडच्या शेतकऱ्यांना आवर्तन एक ते दीड महिना उशिरा मिळाल्याने त्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली. आवर्तनादरम्यान कालव्यातून होणारी गळती लक्षात न घेता ‘टेल’कडे आवर्तन सोडताना ‘हेड’कडचे शेतकरी पाणी उचलतात व ‘टेल’कडे पाणी कमी दाबाने पोचते, असे सांगून अधिकाऱ्यांनी ‘हेड’कडील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला. कालव्याच्या पाण्यातून भरली जाणारी बड्या शेतकऱ्यांची खासगी शेततळी यांसह अनेक पाणी योजनांसाठी कालव्यातील पाणी उचलले जाते. त्याकडे जलसंपदा विभाग डोळेझाक करतो आहे.

Web Title: Chasakman Dam Water Storage