पुरंदरमध्ये ऐंशीपार महिलांच्या मतदान केंद्रावरच रंगल्या गप्पा 

kalas.jpg
kalas.jpg

खळद : खळद (ता. पुरंदर) येथे सकाळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांबाहेर मोठी गर्दी केली होती. या वेळी ऐंशीपार केलेल्या तीन महिला मतदानाच्या वेळी समोरासमोर आल्यावर त्यांना एकमेकींशी बोलण्याचा मोह आवरला नाही.

या वेळी कार्यकर्ते त्यांना मतदानासाठी चला म्हणत असताना त्यांनी मात्र एका ठिकाणी थांबून एकमेकींची अगदी आस्थेने विचारपूस केली. या वेळी सर्वजण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. एकमेंकीविषयी विचारपूस केल्यानंतर त्यांनी मतदान केले. 

या वेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण येत होते. पावसाने उघडीप दिल्याने खळद येथे सकाळीच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत साधारणपणे 25 टक्के मतदान झाले होते.

गेली दोन-तीन दिवस या भागात संततधार पाऊस सुरू होता, यामुळे मतदानाच्या दिवशी पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली तर याचा मतदानावर मोठा परिणाम होईल, अशी धास्ती पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना पडली होती. मात्र, पावसाने सकाळपासूनच उघडीप दिल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com