कर्जच्या बहाण्याने नागरिकांची 63 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांना वैयक्तीक कामासाठी कर्जाची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी इंटरनेटद्वारे उपलब्ध झालेल्या संपर्क क्रमांकावरुन कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला होता. दरम्यान, डिसेंबर महिन्यात फिर्यादी यांच्या मोबाईलवर स्वास्तिक फायनान्स कंपनीच्यावतीने शिवानी नावाच्या तरुणीने त्यांना मेसेज पाठविला.

पुणे : कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी एका नागरिकाची ऑनलाईन पद्धतीने 63 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 13 ते 17 डिसेंबर 2019 या कालावधीत झाली. याप्रकरणी इब्राहिम शेख (वय 37, रा. खडकी ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांना वैयक्तीक कामासाठी कर्जाची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी इंटरनेटद्वारे उपलब्ध झालेल्या संपर्क क्रमांकावरुन कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला होता. दरम्यान, डिसेंबर महिन्यात फिर्यादी यांच्या मोबाईलवर स्वास्तिक फायनान्स कंपनीच्यावतीने शिवानी नावाच्या तरुणीने त्यांना मेसेज पाठविला.

पुण्यातील चुकलेल्या उड्डाणपुलांचं करायचं काय? अजित पवार म्हणाले...

फिर्यादी यांना 5 लाख रुपयांचे कर्ज मंजुर करुन देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून व्हॉटस्‌अपद्वारे कागदपत्रे मागवून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 63 हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकजण जखमी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheated with Citizen With the pretext of getting a loan with for Rs 63000

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: