शेअर मार्केटमध्ये साडे 21 लाख रुपयांची फसवणूक

पांडुरंग सरोदे
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तिघांनी तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच पद्धतीने आणखी आठ जणांचीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाली आहे. 

याप्रकरणी जितेंद्र पाठक (वय 45, रा.ऍमेनोरा पार्क, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठक हे एका आयटी कंपनीमध्ये कार्यरतआहेत. त्यांच्या शेजारच्या इमारतीमध्ये एक व्यक्ती राहण्यास आला होता. त्यांची त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने आपला शेअर मार्केटींगचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यासह एका पुरुष व एका महिलेने त्यांची भेट घेतली.

एका कंपनीचे आपण भागीदार असल्याचे त्यांनी भासविले. त्यानंतर तिघांनी पाठक यांना त्यांनी रिअल इस्टेट व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन केला. 2017 ते जुन 2018 या कालावधीत त्यांच्याकडुन 21 लाख 50 हजार रुपये गुंतवणूकीसाठी घेतले. परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा व मुळ रक्कम पाठक यांना परत केली नाही. त्यासाठी पाठक यांनी वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Web Title: Cheating of a net amount of Rs. 21 lakhs due to excess returns in the stock market