ऑनलाइनद्वारे तिघांना अडीच लाखांना गंडा

Cyber Crime
Cyber Crime

पुणे - काही नागरिकांना लकी ड्रॉ लागल्याचे सांगत, तर काहींना ई-वॉलेटद्वारे पैसे परत करण्याच्या बहाण्याने, तर एका व्यक्तीस साडीखरेदीचा बहाणा करून नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह तिघांचे तब्बल अडीच लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले.

कोंढव्यातील मीठानगर परिसरामध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांना आम्ही फ्लिपकार्डमधून बोलत असून, तुम्हाला सफारी गाडी व साडेबारा लाख रुपयांचा लकी ड्रॉ लागल्याचे सांगितले. गाडी व साडेबारा लाख रुपये मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर एक लाख ५३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनीही त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरले.

त्यानंतर गाडी व पैसे मिळण्यासाठी अनोळखी व्यक्तींना संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

दुसऱ्या घटनेमध्ये वानवडी पोलिस ठाण्यामध्ये हांडेवाडी येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या टीव्हीचे रिचार्ज पॅक संपले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलवरील ‘फोन पे’ या ॲपद्वारे टीव्हीचे पाचशे रुपयांचे रिचार्ज केले. टीव्ही सुरू न झाल्यामुळे फिर्यादी यांनी कंपनीच्या टोल फ्रीवर संपर्क साधून पाचशे रुपयांची मागणी केली. त्यांना तेथून एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने फिर्यादीच्या बॅंकेसंबंधीची माहिती घेतली व खात्यातील ८२ हजार काढून घेतले.

बिबवेवाडी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना ऑनलाइन साडी खरेदी करायची होती. त्या वेळी हॅंडलूम नावाचे वेबपेज त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तेथे काही साड्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांना आवडलेल्या साड्यांसाठी त्यांनी ऑनलाइन ९ हजार ६०० रुपये दिले. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस वाट पाहूनही साड्या घरी आल्या नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com