esakal | पुणे : नगर रस्त्यावरील प्रभागांमध्ये जिकडे तिकडे काय दिसते ते पहा

बोलून बातमी शोधा

Bench

महापालिकेच्या उत्पन्नात घसरण झाली असताना नगर रस्त्यावरील पाच प्रभागांत कोट्यवधी रुपये खर्चून बाक बसविले आहेत. नगरसेवकांनी मागणी करताच सहाशेहून अधिक बाक प्रभागांत मांडण्यात आले आहेत. त्यावरील खर्च मात्र महापालिकेला सापडेनासा झाला आहे. या बाकांचे वजन, प्रभागांत त्यांची किती गरज, ते खरोखरच बसविले आहेत का, याबाबतची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही.

पुणे : नगर रस्त्यावरील प्रभागांमध्ये जिकडे तिकडे काय दिसते ते पहा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या उत्पन्नात घसरण झाली असताना नगर रस्त्यावरील पाच प्रभागांत कोट्यवधी रुपये खर्चून बाक बसविले आहेत. नगरसेवकांनी मागणी करताच सहाशेहून अधिक बाक प्रभागांत मांडण्यात आले आहेत. त्यावरील खर्च मात्र महापालिकेला सापडेनासा झाला आहे. या बाकांचे वजन, प्रभागांत त्यांची किती गरज, ते खरोखरच बसविले आहेत का, याबाबतची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेतर्फे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक ठिकाणी लोखंडी किंवा स्टीलची बाक बसविले जातात. त्यासाठी ‘स’यादीतील निधी वापरण्यात येतो. प्रभागांच्या पातळीवर वर्षागणिक सर्वाधिक कामे याच स्वरूपाची होत असल्याचे नगरसेवकांच्या प्रस्तावावरून दिसून आले आहे. विशेष-म्हणजे, एक-दोन वर्षांनी बाक बसविण्यात येत असल्याच्या नोंदी आहेत. शहरात नेमकी कुठे आणि किती बाक बसविले आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी नगरसेविका राजश्री शिळीमकर यांनी केली होती. यानुसार नगर रस्त्याबाबतची माहिती समोर आली. पालिकेच्या उत्पन्नात वर्षाकाठी दोन-सव्वादोन हजार कोटी तूट होत असल्याने प्रभागांतील किरकोळ कामांवर मर्यादा आणून त्यावर फारसा खर्च करायचा नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांनी घेतली. मात्र, बाक खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागल्याचे महापालिकेने केलेल्या खुलाशावरून स्पष्ट झाले आहे. 

पुणे शहरात धावणार दोनशे मिडी बस

सत्ताधारी किंवा विरोधकांनी ही बाब गांभीर्याने घेतली. त्यामुळे बाक, बकेट खरेदी सुरू आहे. नगर रस्त्यावरील नगरसेवकांनी सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून घेतले. ठेकेदार नेमला; परंतु बाक बसविल्याच्या ठिकाणांचे तपशील महापालिकेतील खाते आणि क्षेत्रीय कार्यालयांकडे नाही. मात्र, प्रभागांनिहाय बाक पुरविल्याचे आकडे प्रशासनाने दिले आहेत.