Pune News : फिरत्या विसर्जन हौद बिलांची व्यवस्थित तपासणी करा मगच पैसे द्या

पुणे महापालिकेने तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली.
Ganesh Visarjan water tank
Ganesh Visarjan water tankesakal

पुणे - महापालिकेने तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली. पण त्यात केवळ १० टक्केच मूर्ती विसर्जित झाल्या आहेत. याचा अर्थ या सेवेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पुढील वर्षी या निविदा काढू नयेत आणि यंदाच्या वर्षी बिल काढताना जीपीएससह सर्व गोष्टीची तपासणी करून पैसे द्यावेत अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

कोरोना काळापासून फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाते. पण आता कोरोनाचा प्रभाव नसल्याने या सेवेची गरज नसल्याने यंदाच्या वर्षीपासून फिरते हौद उपलब्ध केले जाणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. मात्र, अचानक भूमिका बदलून १ कोटी ४२ लाख रुपयांची निविदा प्रशासनाने राबविली.

त्यामध्ये पाचव्या दिवसापासून १५० फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण गणेशोत्सवात ५ लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ५९ हजार १२६ गणेश मूर्तींचे विसर्जन हे फिरत्या हौदात झाले आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यावर टीका केली आहे. ‘महापालिकेने गरज नसताना यंदा दीड कोटी रुपयांची निविदा काढली. दिडशे विसर्जन हौद उपलब्ध करून दिले. पण त्यास नागरीकांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

या ठेकेदाराला या बिलाचे पैसे देताना त्याने प्रत्येक गाडीला जीपीएस लावले होते का?, किती अंतर फिरले यासह इतर गोष्टींची पडताळणी कराव्यात त्यानंतरच पैसे द्यावेत. पुढील वर्षी अशा प्रकारचा वायफळ खर्च करू नये अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com