Ramdas Athawale : "मोदींनी आणलेले चित्ते पाहायला जाणार अन् एक चित्ता घेऊन येणार"

नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे 'बच्चों का खेल नहीं', असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
Ramdas Athawale PM Narendra Modi Cheetah
Ramdas Athawale PM Narendra Modi CheetahSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना नामिबियावरुन आणण्यात आलं. त्या दिवसापासून रोज काही ना काही कारणाने हे चित्ते चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा यांची चर्चा होऊ लागली आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यातला एक चित्ता सोबत आणणार आहेत.

Ramdas Athawale PM Narendra Modi Cheetah
Mission Cheetah : तब्बल 75 वर्षांनी चित्ता परतला भारतात; 'चित्ता' हा शब्द नेमका कुठून आला जाणून घ्या..

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी याविषयीची माहिती दिली. भारतात आणलेले चित्ते आम्ही अजून पाहिलेले नाहीत. पण नॅशनल पार्कमधल्या एका चित्त्याला आम्ही दत्तक घेतलं आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे. आणि मिळाले तर तिथून एक चित्ता घेऊन येणार आहे.

Ramdas Athawale PM Narendra Modi Cheetah
PM Modi: चित्त्यांचं कौतुक सोडा; त्यांचे फोटो काढणाऱ्या मोदींच्या कॅमेऱ्याची किंमत ऐकलीत का?

यासोबतच त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दलही भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. काँग्रेसने त्यांचा पक्ष मजबूत करायला हवा. नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नही हैं, अशा शब्दांत आठवलेंनी राहुल गांधींना सुनावलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com