चेन्नई विमान वाहतूक पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने मंगळवारी पुण्यातून चेन्नईला जाणाऱ्या विमानांनी पूर्ववत उड्डाण केले. विमान वाहतूक सुरळीत झाली आहे,’’ असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले.

वरदा चक्रीवादळामुळे चेन्नईला जाणाऱ्या विमानांचे उड्डाण सोमवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत रद्द केले होते. चेन्नईवरून पुण्याला येणारी विमानेही रद्द झाल्याची माहिती विमानतळावर देण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर चेन्नईला जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणाबद्दल प्रवाशांमध्ये प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते; पण रात्री संबंधित विमान कंपन्यांनी चेन्नईला जाणारे विमान नियोजित वेळी उड्डाण करणार असल्याचा संदेश प्रवाशांच्या मोबाईलवर दिल्याचेही सांगण्यात आले.

अजय कुमार म्हणाले, ‘‘चेन्नईला जाणाऱ्या आज सकाळच्या विमानाने दहा ते पंधरा मिनीट उशिरा उड्डाण केले. त्यानंतर इतर विमानांच्या उड्डाणांमध्ये कोणताही अडथळा आला नाही. चेन्नईमधील चक्रीवादळाचा जोर ओसरल्याने तेथील विमान वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.’’

Web Title: chennai air transport continue