

Ketan Agrawal Lohgad Case new update
esakal
Pune Crime News : लोहगड किल्ल्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तपासाला नवे वळण मिळाले आहे. या गाजलेल्या प्रकरणात आता पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, साहिलला सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील कथित प्रेमसंबंधांची आधीपासून माहिती होती. ही बाब त्याने कुटुंबीयांना किंवा इतर कोणालाही का सांगितली नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.