शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, कोरोनामुळे सिंहगडावरील 'हा' नियोजित कार्यक्रम रद्द!

Sinhgad-Fort
Sinhgad-Fort

खडकवासला : हवेली पंचायत समितीच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळी मंगळवार (ता.17) होणारा पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले की, स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावर समाधी आहे.

दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, ग्रामपंचायत घेरा सिंहगड, छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती, हरजी ढमढेरे परिवार, सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या वतीने आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमाला दरवर्षी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करतात. याठिकाणी शिवप्रेमी, गडप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

या वर्षी देखील या कार्यक्रमाचे पंचायत समिती हवेली यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते; परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे गडावर मंगळवारी (ता.१७) होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com