esakal | छत्रपती शिवाजी महाराजांची जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील समकालीन चित्रे आली समोर
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराजांची जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील समकालीन चित्रे

महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे इतिहास संशोधकांना मिळाली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील समकालीन चित्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे इतिहास संशोधकांना मिळाली आहेत. सतराव्या शतकातील ही चित्रे भारतातील दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली व ‘मिनिएचर’ प्रकारची आहेत. या चित्रांचा शोध भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य व पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी लावला आहे. ही अप्रकाशित चित्रे भारतात आलेल्या तत्कालीन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये हस्तांतरित झाली. त्यानंतर वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयात सुरक्षितपणे सांभाळून ठेवली गेली. संशोधित केलेल्या चित्रांचा अभ्यास करताना पॅरिस येथील अभ्यासक शशी धर्माधिकारी यांनी तारे यांना सहकार्य केले.

हेही वाचा: कुंभमेळ्यात जीवाशी खेळ; एक लाख बनावट कोरोना रिपोर्ट

याबाबत तारे म्हणाले, ‘‘भारतात शिवकाळात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यामध्ये कुतुबशाहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. दरम्यान ही चित्रे महाराज दक्षिण भारताच्या प्रदीर्घ मोहिमेवर गेले असताना काढलेली आहेत किंवा त्या वेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने १७०० इसवी पर्यंत काढलेले असावेत.’’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध सर्व शिवकालीन चित्रांवर सविस्तर माहिती देणारे पुस्तक लवकरच प्रकाशित करणार असल्याचेही तारे यांनी सांगितले.

हेही वाचा: 90 टक्के प्रभावी असणाऱ्या लसीचं उत्पादन करणार सीरम

चित्रांचे वैशिष्ट्य ः

या अप्रकाशित चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजेच यामध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा पायघोळ अंगरखा, सुरवार व पायात मोजडी आहे. त्यांच्या कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात मोत्यांच्या माळा दिसून येतात. यामध्ये पहिले चित्र जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयात आहे. यामध्ये केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखविण्यात आली आहे. दुसरे चित्र पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयात असून यात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र दाखविण्यात आले आहे. तर शिवाजी महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार दाखविण्यात आलेले तिसरं चित्र हे अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात आहे. असे तारे यांनी सांगितले.

हेही वाचा: आता Paytm वर बुक करा लस; जाणून घ्या प्रक्रिया

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातील अनेक पैलू उलगडण्यासाठी तसेच इतिहास प्रेमिंसाठी हा अमूल्य ठेवा मिळाल्याने इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे. समकालीन अस्लायमुळे या चित्रांचे मूल्य वाढते.’’

- पांडुरंग बलकवडे, कार्यवाह-भारत इतिहास संशोधक मंडळ

loading image