

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Unveiled in Kondhwa
Sakal
कोंढवा : हिंदवी स्वराज्याच्या परंपरेला अभिवादन करत पुण्यातील कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले, तर आयोजक आमदार योगेश टिळेकर यांनी प्रास्ताविक करत माहिती दिली. यावेळी आमदार भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, चेतन तुपे-पाटील, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनिषा कदम, वृषाली कामठे, राणी भोसले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाचे सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.