esakal | अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Gunratna_Sadavarte

छत्रपती संभाजीराजे हे मराठ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांची ही भूमिका राजर्षी शाहू महाराजांच्या भूमिकेला साजेशी आहे. संभाजीराजेंचे नेतृत्व हे समाजातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी स्वीकारले आहे.

अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजातील अनेकांचा 'अफजलखानाचे वंशज' असा उल्लेख अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने सदावर्ते यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा 'छावा' प्रमुख धनंजय जाधव यांनी दिला आहे. 

बेताल वक्तव्यांमुळे राज्यातील बहुजन समाजामध्ये तेढ निर्माण होते. यापूर्वीही छावा संघटनेने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सदावर्ते यांना समज देण्याची मागणी केली होती, मात्र, तरीही वारंवार सदावर्ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे छावा संघटनेने म्हटले आहे. 

 पुणे जिल्ह्यात सिंघमने अवैध व्यवसायांवर फास आवळला; बारामतीमध्ये मोठी कारवाई

छत्रपती संभाजीराजे हे स्वत: छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. तसेच लोकशाहीतील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतींनी संभाजीराजेंची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केली आहे, त्यामुळे ते लोकप्रतिनिधी देखील आहेत. आणि एका लोकप्रतिनिधी विषयी कसे बोलावे, याची समज सदावर्ते यांना नाहीय.  

छत्रपती संभाजीराजे हे मराठ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांची ही भूमिका राजर्षी शाहू महाराजांच्या भूमिकेला साजेशी आहे. संभाजीराजेंचे नेतृत्व हे समाजातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी स्वीकारले आहे. असे असताना गुणरत्न सदावर्तेसारख्या व्यक्तीने संभाजीराजेंबद्दल अपशब्द वापरणे आम्ही सहन करणार नाही. सदावर्तेवर सरकाराने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पुढे जे होईल त्याला आम्ही जबाबदार नाही, असेही छावा संघटनेने स्पष्ट केले आहे. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, कारण...​

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज हे आमच्यासाठी केवळ महापुरुषच नाहीत, तर आमच्यासाठी ते धर्म आहेत. आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदावर्ते जेव्हा मराठा आरक्षणाविरोधात लढले, तेव्हा आम्ही काही बोललो नाही, पण आमच्या नेतृत्त्वावर जर कोणी असे बोलत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)