
पिंपरी - कोरोना संसर्गाच्या भीतीने काही नागरिकांनी मांसाहार करणे बंद केले. याचा फटका शहरातील चिकन-मटण व्यावसायिकांना बसला आहे. परिणामी, चिकन ५० टक्क्यांनी, तर मटणाची विक्री २५ टक्क्यांनी घसरली. यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी तूर्तास दुकाने बंद ठेवण्याकडे कल दिसून येतो.
सध्या मटणाचे भाव ५५० ते ६५० रुपये किलो, तर पूर्वी चिकनचे दर १८० ते २०० रुपये होते, ते आता दीडशे रुपयांवर आले आहेत. जिवंत कोंबडी ७५ रुपयांना मिळत असून, चिकनचे भाव पन्नास ते साठ रुपयांपर्यंत घसरले आहेत. दरम्यान, मटणाचे भाव काही अंशी स्थिर आहेत, तर काही ठिकाणी या भावात अद्यापही तफावत आढळून येत आहे.
हेही वाचा : ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
ब्रॉयलर कोंबडीचे भावही निम्म्याने उतरले आहेत. या जातीच्या कोंबडीचे भाव काही दिवसांपूर्वी दीडशे रुपये होते, त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये तंदूर चिकनसाठी या कोंबडीचा जास्त वापर केला जातो. मात्र, आता खवैयांनीच चिकनकडे पाठ फिरवल्याने या कोंबड्यांचीही मागणी कमी झाली आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. मटण खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना कोरोनाचा मांसाहाराशी काहीही संबंध नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. मात्र, नागरिक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. ही भीती कायम राहिल्यास मटण, अंडी, चिकन काही अंशी आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे काही व्यावसायिकांनी चिकन दुकाने बंद केली आहेत. मात्र, शंभर डिग्रीला चिकन-मटण उकळल्यानंतर विषाणू जिवंत राहणे शक्यच नाही. चिकन जास्त काळ साठवणे शक्य नसल्याने व्यावसायिकांनी दुकाने बंदचे पाऊल उचलले असावे. दुकाने बंद करू नयेत. अफवांवर विश्वास ठेवू नये.
- महेश शिंदे, व्यावसायिक, काळेवाडी
सध्याचे भाव (किलोमध्ये)
चिकन लिव्हर - १२०
कोल्ड्रेस चिकन - १२०
चिकन फ्रेश - १६०
बोनलेस चिकन - १४०
मटण - ५५० ते ६५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.