माझं बाळ मला मिळालं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - मी ९९.९९ टक्के सांगतो तिचे प्राण वाचविणे अवघड आहे; पण मी हेदेखील सांगतो, की तिचे प्राण वाचविण्यासाठी मी १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न करीन... डॉक्‍टरांच्या वाक्‍यानंतर देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय खरंतर आमच्या हातात काहीच राहिलं नव्हतं. जेमतेम चार महिन्यांच्या जिवावर केलेली ती शस्त्रक्रिया होती. त्याला आता पाच वर्षे झाली. डॉक्‍टरांच्या शंभर टक्के प्रयत्नाने माझं बाळ मला मिळालं... थॅंक्‍यू डॉक्‍टर!

अपूर्वाची आई बोलत होती. बोलताना प्रत्येक शब्दांतून डॉक्‍टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त होत होती. त्या म्हणाल्या, ‘‘अपूर्वाला जन्मतःच हृदयाचा आजार होता. जन्मानंतर अवघ्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच याचे निदान झाले. त्या वेळी हृदयाला छिद्र असल्याचे समजले. पण, त्यानंतरही हृदयातील आणखी गुंतागुंत तपासण्यांमधून पुढे आली. तिच्या फुफ्फुसाकडून हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे तिच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. त्यासाठी अवघ्या चार महिन्यांची असताना हृदय शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्‍टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, की ‘ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आहे.

शस्त्रक्रिया सुरू असतानाच कोणत्याही क्षणी रुग्णाचे प्राण जाण्याची शक्‍यता ९९.९९ टक्के आहे; पण तिचे प्राण वाचविण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन.’ त्यांच्या या प्रयत्नांना देवाने यश दिले. शस्त्रक्रियेनंतर ७२ तास जोखमीचे होते. तो धोका टळल्यानंतर डॉक्‍टर म्हणाले, ‘ही गेली असती तर मला रात्री झोप लागली नसती.’’  अपूर्वा चार वर्षांची असतानाचा हृदयाचे छिद्र बुजविण्याची दुसरी शस्त्रक्रिया होऊन एक वर्ष झाले. ती ठणठणीत आहे.

Web Title: Chidl Doctor Surgery Success