हरित महाराष्ट्रासाठी 'हा' स्तुत्य उपक्रम : मुख्यमंत्री

Chief Minister Fadnavis praised the initiative for green maharashtra of Pune UniversityChief Minister Fadnavis praised the initiative for green maharashtra of Pune University
Chief Minister Fadnavis praised the initiative for green maharashtra of Pune UniversityChief Minister Fadnavis praised the initiative for green maharashtra of Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी'ची शपथ दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानातंर्गत राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांना कडुनिंबाची 16731 रोपांचे वाटप करुन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, जलसंधारणमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री करत आहेत. ते लोकांच्या मनातले ओळखतात. या तरुणांना पाहिल्यानंतर देशाचे भवितव्य अत्यंत चांगले आहे. असा विश्वास वाटतो. तसेच यावर्षी वारीतील पाच लाख वारकऱ्यांना रेनकोट दिले जाणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. डॉ. करमळकर म्हणाले, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणे हा हेतू नाही. तर आपली वारी स्वच्छ निर्मल करणे हा मुख्य उद्देश आहे. वारीमध्ये आपण सहभागी होऊन वारी स्वच्छ करायची आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्या कार्यक्रम स्थळापासून त्याला दूर नेले. 'रिफ्याकट्री'त केलेल्या आंदोलनातील विद्यार्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांने केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com