Baramati News : मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पुणे विभागात बारामती अव्वल

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये पुणे विभागातील अ व ब वर्ग नगरपालिकेत बारामती नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला
chief minister saksham contest 2023 baramati rank first mahesh rokde politics
chief minister saksham contest 2023 baramati rank first mahesh rokde politicsSakal

बारामती - मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये पुणे विभागातील अ व ब वर्ग नगरपालिकेत बारामती नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एका पत्राद्वारे बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना या बाबत माहिती दिली असून बारामती नगरपालिकेचे अभिनंदन केले आहे.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यातील अ व ब वर्ग नगरपालिकांमधून बारामती नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बुधवारी (ता. 17) मुंबईमध्ये राज्याच्या कोकण, पुणे,

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या सहा महसूल विभागातील सहा प्रथम क्रमांकप्राप्त नगरपालिकांचे सादरीकरण केले जाणार आहे. बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे हे सादरीकरण करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

या सहा नगरपालिकांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये बारामतीचा क्रमांक अठरावा आला होता. लोकसंख्येनिहाय विचार करता बारामती देशात प्रथम क्रमांकावरचे शहर होते. बारामतीपेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या सर्वच सतरा शहरांची लोकसंख्या बारामतीहून अधिकची होती.

गेल्या काही वर्षात बारामती नगरपालिकेचा आरोग्य विभाग व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम करुन शहर स्वच्छता व सुशोभिकरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले, त्या मुळे बारामतीला पुणे विभागात प्रथम क्रमांक तर देशात अठरावा क्रमांक मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वच्छतेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलेले होते. बारामतीतील प्रगतीपथावर असलेले विविध विकासप्रकल्प व सुशोभिकरणाची कामे पूर्णत्वानंतर बारामती अधिक टुमदार व सुंदर शहर म्हणून नावारुपास येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांच्या सर्व सहकारी तसेच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिकांचेही अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com