मुख्यमंत्री ठाकरे बुधवारी पुण्यात; कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (ता. 25) उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (ता. 25) उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मांजरी बुद्रुक येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास वित्त व सहकार मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, 'व्हीएसआय'चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार आहेत.

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द 

साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता प्राप्त साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्हीएसआय'चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chief minister Uddhav Thackeray in pune Tomorrow