कडधान्ये, डाळी भडकल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

चिखली - सणासुदीमुळे मालाला वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेली तात्पुरती बंदी, यामुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात पाच ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच नफेखोरीसाठी मोठ्या प्रमाणात साठेबाजी केली जाते. यामुळेही भाव भडकले असून त्याचा परिणाम आता किरकोळ बाजारातही दिसू लागला असून, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. 

गेल्या दोन महिन्यांत डाळी व कडधान्याला उठाव नव्हता. त्यामुळे कडधान्य आणि डाळींच्या भावात मोठी घसरण झाली होती. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून सणासुदीमुळे कडधान्य व डाळीला मोठी मागणी वाढली आहे. तसेच आयातीत डाळींवर बंदी घालण्यात आली. परिणामी आठवडाभरातच डाळी व कडधान्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ५३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकली जाणारी तूरडाळ आज ६६०० ते ७१०० रुपये क्विंटल इतकी झाली आहे. मूगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, चणाडाळ यांच्या भावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींप्रमाणेच कडधान्यांच्या भावातही वाढ झाली आहे. ५५०० ते ५७०० रुपये क्विंटल भावाने मिळणाऱ्या मुगाचा दर सध्या ६६०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचप्रमाणे चणा, वाटाणा, मसूर, घेवडा, हुलगा, चवळी आदी कडधान्यांच्या भावातही क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच गुळाच्या भावातही दहा ते पंधरा टक्के अशी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही डाळींचे भाव दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

व्यापाऱ्यांची नफेखोरी
वास्तविक बाजारात मुबलक प्रमाणात माल असताना भाववाढ करण्याचे काहीही कारण नाही. सणासुदीमुळे दरवर्षीच या दिवसांत मागणी वाढते. व्यापारी हवामान, आवक आणि मागणी याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. त्यामुळे मागणी वाढताच चढ्या भावाने मालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. परंतु त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते.

Web Title: chikhali pune news dal rate increase