चिक्कीचे तुकडे करणे ताईंनाही झाले अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

दौंड - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १७) गावभेट दौऱ्यासाठी लिंगाळी (ता. दौंड) येथे आल्या होत्या. या वेळी अंगणवाडीतील बालकांना पुरविल्या जाणाऱ्या दगडासारख्या कडक अशा चिक्कीचे नमुने जिरेगाव येथील निर्मला राऊत यांनी सुळे यांच्याकडे देत त्यांना ‘ताई, चिक्कीचं काही तरी करा’, अशी विनंती केली. सदर चिक्की उपस्थितांपैकी कोणालाही दाताने तोडता आली नाही. सुळे यांनी याबाबत चिमुरड्यांविषयी चिंता व्यक्त करीत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्र्यांकडे उद्योजकांसाठी वेळ नाही. ते फक्त गोड बोलतात. मात्र काम करीत नाहीत. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नसून, बलात्कारासारख्या निंदनीय घटनांना भगवा-हिरवा रंग देण्याचे पाप सरकार करीत आहे. ती लाजीरवाणी गोष्ट आहे. दौंड तालुक्‍याने नेहमीच शरद पवार यांच्यावर प्रेम करीत त्यांना साथ दिल्याने तालुक्‍याच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध आहे.’’

राज्यातील उद्योजक आपल्या अडचणी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे चकरा मारत आहेत. परंतु मुख्यमंत्री त्यांना वेळ देत नसल्याने उद्योग राज्याबाहेर जात आहेत. 
- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: chikki issue supriya sule