बालप्रेक्षकांची झुंबड

नीला शर्मा 
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - सध्या बालनाट्यांसाठी रोज दीड हजार ते चार हजार बालप्रेक्षकांची गर्दी उसळते आहे. पुणे, मुंबईतील नाट्यसंस्थांसह नाशिक व रत्नागिरीसारख्या शहरांमधील बालनाट्य निर्मिती संस्था ही नाटकं मोठ्या प्रेमाने सादर करत आहेत. विशेष म्हणजे, कधी नव्हे ते यंदाच्या वर्षी रात्री साडेनऊ वाजताही प्रयोग लावण्याचे धाडस करण्यात करण्यात आले आणि त्यालाही तुडुंब प्रतिसाद मिळाला. तिकिटांअभावी मोठ्या संख्येने प्रेक्षकांना परत फिरावे लागत असल्याचे नाट्यप्रयोग व्यवस्थापक प्रवीण बर्वे यांनी सांगितले. 

बालगंधर्व, भरतनाट्य मंदिर, टिळक स्मारक, यशवंतराव चव्हाण व अण्णा भाऊ साठे या नाट्यगृहांमध्ये ही बालनाट्ये सादर केली जात आहेत. काही नाटकांचा प्रयोग सकाळी साडेनऊला, काहींचा दहाला, तर काहींचा दुपारी साडेबाराला सुरू होतो. संध्याकाळी पाचच्या प्रयोगासारखीच गर्दी रात्री साडेनऊ वाजताही होते. बालकांबरोबर एखादेच मोठे माणूस सोबतीला याऐवजी बदललेले चित्र म्हणजे एकुलते  एक मूल आणि आई-बाबा, त्यांच्याच बरोबर आजी-आजोबा असा परिवार एकत्र आणण्याची किमया आशयसंपन्न आणि नीटनेटकेपणाने बसवलेल्या नाटकांनी केली आहे, असे सत्यजित धांडेकर या नाट्यप्रयोग व्यवस्थापकांनी आवर्जून सांगितले. 

‘अलबत्या गलबत्या’सारख्या रत्नाकर मतकरी लिखित दोन अंकी नाटकातील वैभव मांगले या हरहुन्नरी नटाने साकारलेली चेटकीण पाहायला लहानांबरोबरच मोठेही उत्सुकतेने येतात. ‘लायन किंग’ या गाजलेल्या ॲनिमेशनपटावर आधारित ‘राजा सिंह’ या बालनाट्यात बेचाळीस कलावंतांनी केलेल्या भूमिका पाहताना बालकांबरोबर मोठी माणसेही लहान होऊन खदाखदा हसतात. सई परांजपेंच्या लेखणीतून उतरलेल्या ‘जादूचा शंख’ या जुन्या नाटकाचा प्रयोग दर वर्षीप्रमाणे यंदाही मुले आवडीने बघतात. अलिबाबची गुहा, जादू, शेपटीवाले प्राणी हे नेहमीचे हातखंडा विषय यंदाही आहेत. ‘श्‍यामची आई’ या विषयाची मोहिनी अजूनही संपलेली नाही. 

मजेदार नाटकांचा खाऊ आवडतो  
‘आमच्यासाठी केवढी तरी मस्त नाटकं आली आहेत. आइस्क्रीम आणि खूप खेळण्याबरोबर नाटकांचीसुद्धा मज्जा आहे,’ असं शर्वरी देवधर या छोट्या मुलीनं सांगितलं. तिचा भाऊ शार्दूल म्हणाला, ‘आजी गोष्टी सांगते, त्यांच्यातले प्राणी आणि पक्षी नाटकात बघायला मिळतात. ते आमच्यासारखेच बोलतात. ते ऐकायला आणि राक्षस, चेटकीण बघायला एकदम भारी वाटतं.’

Web Title: Child audience crowd for balnatya