बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

Leopard
Leopard

पिंपळवंडी - येडगाव-खानेवाडी (ता. जुन्नर) येथील रामदास भिकाजी भोर यांच्या शेतात साकुरमांडवा येथील मेंढपाळ लक्ष्मण बाबूराव कुल्हाळ यांच्या पाच महिन्यांच्या नातीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

कुल्हाळ यांनी भोर यांच्या शेतात शेळ्या मेंढ्यांचा वाडा बसवला होता. वाड्याच्या बाजूला रात्री सर्व कुटुंब झोपले होते. आई वडिलांच्या मध्ये कल्याणी सुखदेव झिटे (पाच महिने) झोपली होती. पहाटे तीनच्या सुमारास झोपेत असलेल्या कल्याणी हिला बिबट्याने उचलून नेले. या वेळी झालेल्या आवाजाने आई ताईबाई जागी झाली. तिने मुलीस बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहिले. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी बिबट्याचा पाठलाग केला.

परंतु, अंधार असल्याने बिबट्या दिसेनासा झाला. पहाटे थोडा उजेड पडल्यावर घटनास्थळापासून ४०० मीटर अंतरावर चिकूची बाग व उसाच्यामध्ये मुलगी मृतावस्थेत आढळून आली. उपवनसंरक्षक जयराम गौडा, सहाय्यक वनसंरक्षक मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल डॉ. अजय देशमुख, आकाश डोळस आदींनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त वनअधिकऱ्यांनी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पिंजरे लावण्याचे आदेश - गौडा
उपवनसंरक्षक जयराम गौडा म्हणाले, ‘‘घडलेली घटना दुर्दैवी असून झिटे कुटुंबाला सरकारी निर्णयानुसार असलेली आर्थिक मदत लवकरच देण्यात येईल. पिंजरे लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत.’

बिबट्याने या भागात शेळ्या, मेंढ्या, जनावरे यांच्यावर हल्ले केले आहेत. वाहनचालकांचा पाठलागही केला होता. वारंवार  मागणी करूनही पिंजरा न लावल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे. 
- गणेश गावडे, सरपंच, येडगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com