पुण्यामध्ये मुलींचा बालविवाह रोखला

Marriage
Marriage

पुणे - खरं तर त्या दोघीही अभ्यासात हुशार... आता त्या दहावीची परीक्षा देत होत्या अन्‌ पुढे शिकण्याची त्यांची प्रबळ इच्छाही होती. मात्र आई-वडिलांनी डोक्‍यावरचा भार कमी करण्यासाठी या अल्पवयीन मुलींचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने जास्तच मोठ्या असलेल्या तरुणांबरोबर ठरविले. परीक्षा झाल्यानंतर त्यांचे लग्न एप्रिलमध्ये होणार होते. मात्र या मुलींनी आई घरकाम करत असलेल्या मालकिणीस हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी डेक्कन पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या मुलींना संरक्षण दिले आणि बाल न्यायालयामार्फत त्यांना नामांकित शिक्षण संस्थेकडे शिक्षणासाठी सोपवले.

डेक्कन पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये १५ व १६ वर्षे वयाच्या मुली राहतात. आई डेक्कन परिसरात घरकाम करते. या मुली आईसमवेत कामाच्या ठिकाणी जातात. आई घरकाम करत असलेली मालकीण दोन्ही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि पती मद्यपी असल्यामुळे आईने या मुलींचे लग्न त्यांच्या पेक्षा मोठ्या असलेल्या २५ व ३० वर्षे वयाच्या तरुणांशी ठरवले होते. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे लग्न होणार होते. 

या मुलींना परिस्थितीची जाणीव होती; पण त्यांना शिकून मोठे होऊन आईची गरिबी दूर करायची होती. म्हणून त्यांनी आई घरकाम करत असलेल्या मालकिणीला फोनवरून माहिती दिली. या महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली निकम, पोलिस कर्मचारी माधुरी कुंभार, स्वाती जगताप, अभिजित चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी मुलींचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत धाव घेतली. पेपर संपल्यानंतर जबाब नोंदवून त्यांना बाल न्यायालय समितीसमोर नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com