मुलांचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल केलेल्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. हिंजवडी, चिंचवड व सांगवी या पोलिस ठाण्यांमध्ये सोमवारी एकाच दिवशी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

पिंपरी - अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. हिंजवडी, चिंचवड व सांगवी या पोलिस ठाण्यांमध्ये सोमवारी एकाच दिवशी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी हिंजवडी पोलिसात एकावर, चिंचवड पोलिस ठाण्यात एकावर, तर सांगवी पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी मोबईलद्वारे फेसबुक अकाउंटवर अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ अपलोड करून ते व्हायरल केले. त्यांच्यावर आयटी ऍक्‍ट व बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child pornography videos