बच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे. 

स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी शाळा व मॉल्समध्ये ऑडिशन्स होणार आहेत. ऑडिशनमधून निवडण्यात आलेले स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पारितोषिक वितरण २५ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी होईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

वयोगटानुसार नृत्य स्पर्धा ‘अ’ ते ‘क’ या गटात विभागण्यात आली आहे. ‘अ’ गटात बालवाडी ते दुसरी, ‘ब’ गटात चौथी ते सहावी, ‘क’ गटात सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ‘अ’ गटात बालवाडी ते पहिली व ‘ब’ गटात दुसरी ते पाचवी अशी विभागणी करण्यात आली आहे. ‘आयटम साँग्स’ ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

ऑडिशनची ठिकाणे 
(वेळ - सायंकाळी ५ ते रात्री ८)
 नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड : शनिवार, १५ डिसेंबर 
 सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी : रविवार, १६ डिसेंबर 
 क्‍लारा ग्लोबल स्कूल, घोरपडी रोड, हडपसर : शनिवार, २२ डिसेंबर  
 अभिरूची मल्टिप्लेक्‍स मॉल, सिंहगड रोड : रविवार, २३ डिसेंबर 
 महत्त्वाचे : दिलेल्या शाळांमध्ये सोमवारपासून (ता. ३) नोंदणी सुरू आहे.  

स्पर्धेसाठी आकारण्यात येणारे शुल्क
 सोलो नृत्य : १५० रुपये
 फॅन्सी ड्रेस स्पर्धा : १५० रुपये
 अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

Web Title: Children Dance Fancy Dress Competition