चिमुकल्यांचेही जरा हटके पोर्टफोलिओ!

गायत्री वाजपेयी
गुरुवार, 20 एप्रिल 2017

चांगल्या चेहऱ्यांना मिळते मॉडेलिंगची संधी 
पुणे - आपल्या मुलाचे सुंदर, निरागस फोटो काढण्याची हौस प्रत्येक आई-बाबांना असतेच. त्यामुळेच आता लहान मुलांचेही व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मॉडेलिंग क्षेत्रात लहान मुलांची वाढती मागणी, स्थानिक तसेच नामवंत ब्रॅंडकडून मिळत असणाऱ्या जाहिराती, ग्लॅमरस लाइफस्टाइल अन्‌ दिवसाला एक हजार ते काही लाखांपर्यंत मिळणारे मानधन यामुळे पालक आपल्या मुलांचे पोर्टफोलिओ तयार करून घेत आहेत.  

‘इझी मनी’चा एक आगळावेगळा पर्याय ठरत असलेल्या कमर्शियल पोर्टफोलिओमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील एकदम स्टायलिश ॲटिट्यूड, तर कधी हळूवार लाजत केलेले स्मितहास्य, कधी नजरेतून बोलणारा अवखळपणा, मस्ती, कधी राग, रुसवा तर विविध वेशभूषा, केशभूषा यांद्वारे चिमुकल्यांचे अनोखे पैलू टिपून त्यांचा ‘पोर्टफोलिओ’ केला जात आहे. त्यासाठी हजारो रुपयेही खर्च केले जातात. यामध्ये आउटडोअर शूटिंगसाठी उद्यान, मॉल्स, रिकामा रस्ता अशा हटक्‍या लोकेशन्सचा वापर केला जातो. तर थीम बेस्ड फोटोशूटसाठी फेरीटेल, कार्टून सुपरहीरोझ, भारतीय पारंपरिक, तर कधी ऐतिहासिक पद्धतीच्या वेशभूषा केल्या जातात. आपल्या मुलांचे आगळेवेगळे रूप सोशल मीडियावर पोस्ट करण्याचाही ट्रेंड दिसून येत आहे.         

छायाचित्रकार नीलेश काळे म्हणाले, ‘‘पालकांमध्ये आपल्या मुलांचा पोर्टफोलिओ करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तर दिसतातच; शिवाय त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढतो. स्वतःची नव्याने ओळख होत असल्याने मुलांमध्येही याबाबत कुतूहल असल्याचे दिसून येते; मात्र बरेचदा हा पोर्टफोलिओ केवळ आठवणी जपण्यासाठी नव्हे, तर एखाद्या ॲडसाठी अथवा मॉडेलिंगसाठी आपल्या मुलाला संधी मिळावी म्हणून तयार केला जातो; परंतु अनेकदा हे कमर्शिअल पोर्टफोलिओ म्हणजे पालक आपल्या मुलातील क्षमता, त्याचा कल न पाहता तयार करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आवडीकडेही लक्ष दिले पाहिजे.’’ 
 
असा करतात पोर्टफोलिओ  
छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे म्हणाले, ‘‘अगदी पंधरा दिवसांच्या बाळापासून ते किशोरवयीन मुलांचा पोर्टफोलिओ केला जातो. त्यांचे वेगवेगळे मूड्‌स, एक्‍सप्रेशन्स टिपले जातात. यासाठी मुलांना रीतसर मार्गदर्शन करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला जातो. या पोर्टफोलिओमध्ये इनडोअर, आउटडोअर, थीमनुसार अशा विविध प्रकारचे फोटोशूट केले जातात. साधारण सहा हजार ते पंधरा हजार रुपयांत पोर्टफोलिओ तयार केले जातात.’’ 

Web Title: children portfolio