मुलांची दुचाकीची हौस धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

हडपसर - मोटार वाहन कायद्यानुसार १६ वर्षांवरील मुलांना गिअर नसलेली आणि १८ वर्षांवरील मुलांना गिअर असलेली दुचाकी चालविण्याची परवानगी आहे. मात्र हडपसर परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी चालवितानाचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. 

अनेकदा कारवाई करूनही हे चित्र बदलत नाही. पालक त्यांची जबाबदारी पार पाडत नसल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईकडे वाहतूक पोलिसांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

मुलाची हौस भागविण्यासाठी अनेक जण मोटार वाहन कायद्यातील नियमांची पायमल्ली करीत आहेत. अल्पवयीन मुलाला एकट्याला गर्दीच्या रस्त्यांवर गाडी चालवायला देत आहेत. पाल्याच्या हट्टापायी रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो याचा पालकांना विसर पडत आहे. भरधाव गाडी चालविण्याचे व ‘ट्रिपल सीट’चे प्रमाणही अधिक आहे. तसेच ‘नो एन्ट्री’तून गाडी चालविण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत १३ अल्पवयीन मुले व गाडीच्या मालकांवर खटले दाखल करून त्यांना १५ हजार १०० रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये. 
- जे. डी. कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: children two wheeler drive dangerous