चिनी वस्तूंचे आव्हान मोडून काढणारी संघटना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - सुबक तरीही स्वस्त असा लौकिक मिळविलेल्या शाडू मातीच्या चिनी वस्तूंचे आव्हान मोडून काढण्यात गुजरातेतील मोरबी गावाच्या परिसरातील उद्योगांनी यश मिळविले आहे आणि आता लवकरच या वस्तूंची निर्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. 

पुणे - सुबक तरीही स्वस्त असा लौकिक मिळविलेल्या शाडू मातीच्या चिनी वस्तूंचे आव्हान मोडून काढण्यात गुजरातेतील मोरबी गावाच्या परिसरातील उद्योगांनी यश मिळविले आहे आणि आता लवकरच या वस्तूंची निर्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. 

‘पूना टाइल्स ॲण्ड सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती. त्यात चिनी मालाला देण्यात येत असलेल्या सडेतोड उत्तराची माहिती देण्यात आली. या बैठकीस अशोक ओसवाल, संजय गांधी, कीर्ती मेहता, जितू मेहता, दर्पण जैन, जिग्नेश वडसोला, राजेश पटेल, योगेश शहा, आश्‍विन गांधी, जगदीश पटेल आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते.

पुणे शहरात टाइल्स ॲण्ड सॅनिटरीवेअरच्या व्यवसायाला स्वातंत्र्यानंतर सुरवात झाली. बुधवार व रविवार पेठेतून सुरू झालेला हा व्यवसाय जसा वाढत गेला, तशी त्याला जागा कमी पडण्यास सुरवात झाली. जागा, वाहतूक कोंडी, शहरात अवजड वाहनांना बंदी अशा अनेक कारणांमुळे हा व्यवसाय शहराबाहेर गेला. टाइल्स ॲण्ड सॅनिटरीवेअर क्षेत्रात जवळपास ८०० कंपन्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या कंपन्या या गुजरातमध्ये आहेत. शहरात व्यवसाय करत असताना माल गाडीत चढविण्यासाठी आणि उतरविण्यासाठी अवास्तव मजुरी सांगितली जाते, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याची तक्रार या व्यापाऱ्यांनी केली. सर्व विक्रेत्यांसाठी टाइल हब उभारण्यासाठी जागा मिळावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

 संघटनेची १९९७ ला सुरवात
 पुण्यात ४५० विक्रेते, त्यातील २७० हे संघटनेचे सदस्य
 जीएसटी कर सरसकट १२ टक्के करा
 रिंग रोडच्या जवळ टाइल्स हब असावे
 टाइल्स-सॅनिटरीवेअरची पुण्यातील उलाढाल दोन हजार कोटींची

Web Title: China Goods Poona Tiles and Sanitaryware Dealers Association