governor kaiwalya parnaik
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘चीनची धोरणात्मक मानसिकता विस्तारवादी आहे. आपल्या शेजारील प्रदेशांवर दावा करण्याबरोबरच नकाशे बदलणे, ठिकाणांची नावे बदलणे आणि सीमावर्ती भागांवर हक्क सांगणे, हे चीनच्या रणनीतीचा भाग आहे. त्यातून ‘कार्टोग्राफिक ॲग्रेशन’ आणि मानसिक दबाव निर्माण केला जात होता. मात्र, आता भारतानेही अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती भागात तब्बल चार हजार किलोमीटरचे रस्ते आणि फ्रंटियर हायवे सारख्या प्रकल्पांमधून पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे,’ असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) कैवल्य परनाईक यांनी केले.