मांजाचा फास सुटेना!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

यंदा मांजा कुणाच्या जिवावर ‘संक्रांत’ आणणार, असा प्रश्‍न पुणेकरांकडून उपस्थित होऊ लागला आहे. या धोकादायक मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असून, त्यावर महापालिका व पोलिस प्रशासनाकडूनही अद्याप कारवाई नसल्याचे वास्तव आहे. 

पुणे - मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर लहानग्यांसह मोठ्यांनीही शहरात पतंग उडविण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी बंदी असलेला चिनी व नायलॉन मांजा वापरण्यात येत असल्यामुळे यंदा मांजा कुणाच्या जिवावर ‘संक्रांत’ आणणार, असा प्रश्‍न पुणेकरांकडून उपस्थित होऊ लागला आहे. या धोकादायक मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असून, त्यावर महापालिका व पोलिस प्रशासनाकडूनही अद्याप कारवाई नसल्याचे वास्तव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोकादायक मांजाची विक्री करण्यास बंदी असल्याने आम्ही त्याची विक्री करीत नाही. ग्राहकांनाही तसे स्पष्टपणे सांगतो. इंडियन मांजा घेण्यासाठी ग्राहकांना आग्रह करतो. एखाद्याच्या जिवाशी खेळून व्यवसाय करणे चुकीचे आहे. 
-ए. एच. कोल्हापुरवाला, रविवार पेठ

बंदी असलेल्या मांजा विक्रीवर पोलिसांकडून दोन वर्षांपासून कारवाई केली जात आहे. या वर्षीही ही कारवाई कायम राहील. त्यासंबंधीच्या सूचना गुन्हे शाखेला देण्यात आल्या आहेत.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

धोका नसलेला मांजा
    इंडियन मांजा
    बारीक मांजा
    पांडा मांजा

धोकादायक मांजा
    चिनी
    नायलॉन
    सिंथेटिक

 विक्रीची ठिकाणे 
    रविवार पेठ
    बोहरी आळी
    भवानी पेठ
    नाना पेठ
    महात्मा फुले मंडई
    शिवाजी रस्ता
    लोहियानगर
    कासेवाडी
    उपनगरे
प्रकारानुसार मीटरची किंमत (रुपये)
५०
१००
२००
३००

दोन बळी जाऊनही...
कामानिमित्त कार्यालयात निघालेल्या ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार तसेच डॉ. कृपाली निकम यांचा चायनीज मांजाने गळा कापल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना शहरात दोन वर्षांत घडल्या. याखेरीज अनेक जण गंभीर जखमी होण्याबरोबरच शेकडो पक्ष्यांचाही याच मांजाने जीव घेतला. राष्ट्रीय हरित लवादाकडून चायनीज व नायलॉन मांजाच्या विक्रीला बंदी असतानाही शहरात सर्रासपणे या मांजाची विक्री होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese and nylon manja