त्या चिनी प्रवाशाची चाचणी ‘निगेटिव्ह’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

दिल्ली येथून पुण्याकडे येणाऱ्या विमानात अस्वस्थ वाटू लागल्याने नायडू रुग्णालयात दाखल केलेल्या चिनी नागरिकासह पाच जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

पुणे - दिल्ली येथून पुण्याकडे येणाऱ्या विमानात अस्वस्थ वाटू लागल्याने नायडू रुग्णालयात दाखल केलेल्या चिनी नागरिकासह पाच जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ली सियोन असे चिनी प्रवाशाचे नाव असून, दिल्ली येथून पुण्याकडे येणाऱ्या विमानाने तो प्रवास करीत होता. दिल्लीहून १७७ प्रवाशांना घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी विमानाने शुक्रवारी सकाळी उड्डाण केले. त्या वेळी ली सियोनला अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याला उलट्या झाल्या. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पुणे विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.

अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

या विषाणूचा उद्रेक झालेल्या देशामधून मुंबई विमानतळावर आलेल्या १८ हजार ८४ प्रवाशांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. १८ जानेवारीपासून ३५ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese person corona test negative