Chitra Wagh : सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती करा- चित्रा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

Chitra Wagh : सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती करा- चित्रा वाघ

तळेगाव ढमढेरे : भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक करत जनजागृती करावी. पंतप्रधान व सरकारच्या विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवाव्यात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांनी समाजकार्य करावे. रोजच्या धकाधकीतून महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या जीवनात आनंद मिळवून द्यावा. महिलांना आनंदी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. प्रत्येकाला आईचे संस्कार सामाजिक प्रेरणा देतात. कुटुंबासाठी पुरुषांनीही वेळ द्यावा असे मत प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्यातर्फे आयोजित केलेल्या "होम मिनिस्टर" या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी चित्रा वाघ बोलत होत्या. अवघ्या सात मिनिटांच्या भाषणात चित्रा वाघ यांनी राजकारणावर एकही शब्द न बोलता जयेश शिंदे यांनी राबविलेल्या विविध विधायक उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास नरके, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहित खैरे, सचिव डॉ. राजेंद्र ढमढेरे, दिलीप शेलार, भाग्यश्री गायकवाड, आप्पासाहेब बेनके, डॉ. रवींद्र टेमगिरे, बाबुराव ढमढेरे, रवींद्र दोरगे, वैभव गवारे, परेश सातपुते, हर्षवर्धन काळभोर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कामगार आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले.