"समाजमाध्यमातून चांगल्या गोष्टीच निवडा...' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे - ""अंगणात टाकलेल्या धान्यातून कोंबड्या चोचीने धान्यच टिपतात. खडे-माती तसेच पडू देतात. समाजमाध्यमांचेही तसेच आहे. आपण माध्यमांतून चांगल्या गोष्टींची निवड करून चुकीच्या, वाईट गोष्टी तिथंच सोडून दिल्या पाहिजेत. आपला मेसेज कुणासाठी तरी जिवघेणा ठरू शकतो याची काळजी घेतली पाहिजे,'' असे मत नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी व्यक्त केले. 

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा इथे 1 जुलै 2018 ला "मुलं पळवणारी टोळी गावांमध्ये फिरते' या व्हॉट्‌सऍपवरून पसरविण्यात आलेल्या अफवेमधून पाच लोकांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या अमानवीय घटनेमुळे देश हादरला होता. यातून अस्वस्थ झालेले तरुण कार्यकर्ते शहाजी शिंदे यांनी लोकांना अशा अफवांपासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन जनजागृतीचे काम केले. त्यांनी समाज कार्याचे शिक्षण घेणाऱ्या (एमएसडब्ल्यू) 12 विद्यार्थ्यांची मदत घेतली. घटनेच्या आठव्या दिवसांपासूनच त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले. पोलिस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, आश्रम शाळा, महाविद्यालये आदींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून आदिवासी जनतेला अफवांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. 

गावकरी आणि आदिवासी बांधवांच्या सोप्या भाषेत पथनाट्याची निर्मिती केली. यातून अनेक प्रश्न विचारले. अफवा कशी खोटी आहे. याची खात्री पटवून दिली. इथून पुढे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन या माध्यमातून आम्ही लोकांना करत आहोत आणि या कामाला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. 
- शहाजी शिंदे, अध्यक्ष नवनिर्मिती संस्था, धुळे 

Web Title: Choose the good things from community says shahaji shinde