Pune : जुन्या मशिदीची हानी नाही; छोटा शेख सल्ला दर्गाप्रकरणी प्रशासनाची स्पष्टोक्ती

कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळील छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील जुन्या मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे शनिवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील जुन्या मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नाही
छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील जुन्या मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नाहीSakal

Pune News : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळील छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील जुन्या मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे शनिवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दर्ग्याच्या परिसरात नवी मशीद मान्य नकाशाप्रमाणे करण्यात येईल. या भागातील बेकायदा वीटकाम, दरवाजे, खिडक्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर स्वत:हून काढू, असे विश्वस्तांनी जाहीर केले.

छोटा शेख सल्ला दर्गा, तसेच मूळ बांधकामाला कोणीतीही हानी पोहोचणार नाही. १९२७ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार (गॅझेट) जुन्या मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नाही. ३० मार्च २०१९ रोजी महापालिकेने दर्गा ट्रस्‍टला काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नव्या मशिदीत बेकायदा झालेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेण्याचे बैठकीत ठरले.

अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिकेने ट्रस्टला २२ फेब्रुवारीला नोटीस बजावली होती. त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यात कार्यवाही न झाल्याने महापालिकेने कारवाईची तयार सुरू केली. त्यासाठी सात जेसीबी व सुमारे २० डंपरची व्यवस्था टिळक पुलाजवळ करून ठेवण्यात आली होती.

नूतनीकरणाला मदत

महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासन न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करेल. बांधकाम परवानगीबाबत अर्ज आल्यानंतर नियमानुसार प्रशासन सकारात्मक विचार करेल. विश्वस्तांनी विनंती केल्यास कायदेशीर बांधकामाच्या नूतनीकरणासाठी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) प्रशासन मदत करेल.

शांततेचे आवाहन

दर्गा परिसरात कारवाई होणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरली. त्यानंतर दर्ग्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाला. या परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जमाव जमल्यानंतर पोलिसांनी तातडीने जादा कुमक मागवून घेतली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com