शहरात नाताळ उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील विविध चर्चमध्ये सोमवारी (ता. २४) रात्री दहापासून मध्यरात्रीपर्यंत नाताळची गाणी (कॅरल सिंगिंग) आणि ‘पवित्र मिस्सा बलिदान’ ही प्रार्थना सादर करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्तीबांधव सहभागी होते. चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा जिवंत व सचित्र देखावा साकारला. आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीने चर्च सजले होते.

ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ‘हॅपी ख्रिसमस’, ‘मेरी ख्रिसमस’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. केक व भेटवस्तूंची देवाणघेवाण करून मिष्ठान्नाचा आस्वाद घेतला. मंगळवारी (ता. २५) सकाळी शहरातील विविध चर्चमध्ये ‘पवित्र मिस्सा बलिदान’ ही प्रार्थना मराठी व इंग्रजी भाषेत सादर करण्यात आली. 

सोमवारी रात्री दहापासूनच शहरातील अवर लेडी ऑफ कन्सोलर ऑफ दी अफ्लिकटेड चर्च (पिंपरी), होली क्रॉस चर्च (दापोडी), होली ट्रिनिटी चर्च (नवी सांगवी), सेंट फ्रान्सिस झेविअर चर्च (चिंचवड), इनफंट जिझस चर्च (कृष्णानगर-निगडी) यासह अन्य चर्चमध्ये विविध कार्यक्रम झाले.

सांताक्‍लॉजच्या वेशभूषेतील तरुणांनी लक्ष वेधून घेतले. पिंपरीतील अवर लेडी ऑफ कन्सोलर ऑफ दी अफ्लिकटेड चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा जिवंत देखावा सादर केला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून ख्रिस्ती बांधव राहत असलेल्या भागांमध्ये दररोज सायंकाळी कॅरल सिंगिंग, येशू जन्माच्या देखाव्यांचे सादरीकरण केले.

Web Title: Christmas Celebration