विविध कार्यक्रमांनी नाताळचे ‘सेलिब्रेशन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - प्रार्थना, गाणी, फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि गुणदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी मंगळवारी शहरात नाताळचे सेलिब्रेशन झाले. विविध चर्चमध्ये रंगीबेरंगी सजावट बघायला मिळाली. 

पुणे - प्रार्थना, गाणी, फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि गुणदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी मंगळवारी शहरात नाताळचे सेलिब्रेशन झाले. विविध चर्चमध्ये रंगीबेरंगी सजावट बघायला मिळाली. 

विशेषतः लहान मुलांमध्ये नाताळची उत्सुकता बघायला मिळाली. सांताक्‍लॉजची लाल टोपी, विशिंग सॉक्‍स, जिंगल बेल्स्‌, चांदण्या, आकर्षक आकारातील दिवे, विद्युत रोषणाई व ख्रिसमस ट्री अशा सजावटीच्या वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजार सजले होते. सगळ्याच चर्चमध्ये नाताळची सुरवात ही आदल्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माने झाली. ‘वॉच नाइट’ उपासना आणि कॅरल संगीत हे नाताळचे विशेष आकर्षण असते. रात्री ख्रिस्त जन्मोत्सवावेळी या संगीतानेच त्यांच्या आगमनाचा आनंद ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. हा जन्मोत्सव विविध देखाव्याने मांडण्यात आला होता. विशेषतः शहरातील चर्चमध्ये हे देखावे आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. 

नाताळ दिवशीची पहिली प्रार्थना सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान पार पडली. त्यानंतर संदेश, विशेष उपासना असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. चर्च ऑफ दी होली नेम तर्फे रविवारी येशू ख्रिस्ताच्या देखाव्याची मिरवणूक काढली होती.

ख्राईस्ट चर्च, चर्च ऑफ दी होली नेम, इमॅक्‍युलेट कॉन्सेप्शन, चर्च ऑफ दी होली एंजल्स, सेंट मेरी चर्च, सेंट मॅथ्यूज चर्च, देशपांडे चर्च, ओल्डडॅम मेथडीस्ट असे शहरातील सर्वच चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंनी संदेश देऊन लोकांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Christmas Celebration