Christmas 2019 : जिंगल जिंगल चोहीकडे!

अक्षता पवार
Thursday, 19 December 2019

भेटवस्तूंचे अनेक पर्याय
आपल्यासाठी सांताने काय गिफ्ट आणले आहे, याची उत्सुकता सगळ्यांना असते. प्रत्येक वर्षी बाजारांमध्ये नवनवीन वस्तूंचे आगमन होते. मग ते छोटे-छोटे सांताक्‍लॉजच्या बाहुल्या असो, खेळणी किंवा चॉकलेट असो. अनेक ठिकाणी मजा म्हणून सिक्रेट सांता आणि ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येते. ही संकल्पना मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि इतर ठिकाणी ही रुजली आहे. यामध्ये सगळ्यांच्या नावांच्या चिठ्ठया करून एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. त्या व्यक्तीला आवडेल अशा प्रकारचे गिफ्ट घेण्यासाठी आता बाजारपेठेतच जाऊन शोधाशोध करण्याऐवजी ऑनलाइन शॉपिंगच्या पर्यायाला मोठा प्रतिसाद आहे. यामध्ये विविध प्रकारचे आणि महत्त्वाचे म्हणजेच लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आवडेल अशा भेटवस्तू देण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

पुणे - बच्चे कंपनी खास तुमच्यासाठी, धमाल मस्तीचा दिवस येतोय. डिसेंबरचे पंधरा दिवस सरत आलेत, लवकरच काही शाळांना सुटीही लागेल...आणि हो तुमच्या भेटीला सांताक्‍लॉजही येईल, तुम्हाला तो चॉकलेटही देईल...म्हणजे काय नाताळचा उत्सव. हा उत्सव तुमच्याकरिता अधिकच आनंददायी करण्यासाठी बाजारपेठही सजली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारपेठेत विविध आकाराचे आणि आकर्षक विद्युतरोषणाई असलेले सांताक्‍लॉजचे मुखवटे, ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी मेणबत्त्या, चॉकलेट, लाल लाल रंगाच्या टोप्या, जिंगल बेल्स आणि इतर सजावटींच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. 

खवय्यांनो ई-सकाळच्या फूड सेक्शनला नक्की भेट द्या 

नाताळ सण म्हणलं की सांताक्‍लॉजकडून मिळणारे गिफ्ट आणि त्यामुळे आनंदित झालेली मुले असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. या वर्षी ख्रिसमसला नवीन काय करता येईल, याचा विचार करत नागरिक तयारी करत आहेत. बाजारपेठांत आणि दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. सध्या बाजारांमध्ये विद्युतरोषणाई असलेल्या जिंगल बेल्स, टोप्या, सांताक्‍लॉजचे मुखवटे व बाहुल्या उपलब्ध आहेत. याचबरोबर विविध चर्चमध्ये नाताळ निमित्त रंगरगोटी सुरू आहे.

ख्रिसमस ट्री आणि इतर सजावटींच्या वस्तूंना आकर्षक बनविण्यसाठी या वर्षी आम्ही एलईडीचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. लहान मुलांसाठी केक, चॉकलेट, लाइट असलेल्या सांता क्‍लॉजच्या बाहुल्या असे बरेच पर्याय ठेवले आहेत. 
- राकेश अगरवाल, दुकानदार

छोटे घर असल्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन काय करायचे, हा प्रश्‍न मला पडतो; परंतु दुकानात छोट्या आकारात उपलब्ध असलेले ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स आणि इतर सजावटींच्या वस्तूंमुळे हा प्रश्‍नदेखील सुटला आहे. आता हवी तशी सजावट करता येईल.
- ग्लोरी शिंगारे, ग्राहक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Christmas Festival Celebration in Pune