Pune Traffic : ख्रिसमसचा उत्साह; खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, MG रोडवर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

Pune Traffic : ख्रिसमसचा उत्साह; खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, MG रोडवर वाहतूक कोंडी

पुणे : ख्रिसमसनिमित्त सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर पुणेकरांची गर्दी झाली आहे. ख्रिसमसनिमित्त अनेकजण आपल्या मुलांना घेऊन खरेदीसाठी आले आहेत. त्यामुळे पुण्यात कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रोडवर ग्राहकांची गर्दी जमा झाली आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ग्राहकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या रांगा लागल्या असून या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर आज ख्रिसमसचा सण आणि रविवार दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक बाहेर पडले आहेत.

हेही वाचा: Sunita Documentary : स्मशानातील भयानक वास्तव दाखवणारी 'सुनिता'

दरम्यान, आज ख्रिसमस असल्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर लहान मुलांना गिफ्ट दिले जातात. तर महात्मा गांधी रोड हा ग्राहकांना वेधून घेणारा परिसर असून या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Pune NewsTraffic