यावर्षी नाताळची पूर्व रात्र उबदार ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे : शहरात दहा वर्षांमधील नाताळची सर्वांत उबदार पूर्व रात्र सोमवारी नोंदली गेली. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 15.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 
 

पुणे : शहरात दहा वर्षांमधील नाताळची सर्वांत उबदार पूर्व रात्र सोमवारी नोंदली गेली. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 15.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरात नाताळाच्या पूर्व रात्री थंडी असते. त्यामुळे स्वेटर, जर्किंन, कानटोपी असे उबदार कपडे घालून पुणेकर कॅंम्प भागात फिरत असतात. या वर्षी मात्र, पहाटेपर्यंत फारशी थंडी जाणवत नव्हती. त्यामुळे उबदार कपड्यांशिवाय पुणेकरांनी नाताळाचे स्वागत केले. 

पुण्यात यापूर्वी 2013 मध्ये नाताळाच्या पूर्वरात्री सर्वाधिक किमान तापमान 13.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. यंदा मात्र दहा वर्षांमधील हा उच्चांक मोडत किमान तापमानाच्या पाऱ्याने 15.9 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. शहरात तीन वर्षांपूर्वी नाताळाच्या आदल्या रात्री किमान तापमान 7.8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी आल्याची नोंद हवामान खात्यात झाली आहे. 

शहरात मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दुपारनंतर गार वारे वाहून लागल्याने संध्याकाळपर्यंत हवेत गारवा जाणवत होता. पुढील दोन दिवस किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 
नाताळाच्या पूर्व रात्रीची स्थिती (आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 
वर्ष किमान  तापमान 
2018        15.9 
2017        11.1 
2016        10.9 
2015          7.8 
2014        10.6 
2013        11.3 
2012        13.1 
2011          9.7 
2010          9.5 
2009          8.5 
2008        12.4 
(स्त्रोत ः भारतीय हवामान विभाग) 

 

Web Title: Christmas night was warmest in last 10 year