पोलिसमित्रांविरुद्ध नागरिकांचा तक्रारीचा पाढा

पोलिसमित्रांविरुद्ध नागरिकांचा तक्रारीचा पाढा
SYSTEM



पुणे, ता. २१ ः ‘‘आईची तब्येत बिघडल्याने तिला मोटारीमधून दवाखान्यात घेऊन जात होतो, त्यावेळी बिबवेवाडी येथे पोलिसांनी अडविले. पोलिसांना कारण सांगितल्यानंतर त्यांनी सोडले. मात्र, तेथेच थांबलेल्या पोलिस मित्राने मोटार अडवून हुज्जत घालत अरेरावी सुरू केली. आईनेही पोलिस मित्राला विनंती केली, तरीही तो सूडबुद्धीने वागत होता. हा प्रकार पोलिसांसमोर सुरू होता.’’ हा अनुभव मांडला आहे, सामाजिक कार्यकर्ता वैभव वाघ याने. याच पद्धतीने अनेक नागरीकांनी पोलिस मित्रांच्या मुजोरपणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिस मित्रांचाच नागरिकांना जाच होत असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले. अत्यावश्‍यक व महत्त्वाच्या कामासाठी ओळखपत्र जवळ बाळगून बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पोलिस मित्रांनी त्यांना दिलेल्या त्रासाबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौक, केशवनगर, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप बाग, सिंहगड रस्ता परिसरातील उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिस मित्रांचे वाईट अनुभव आले असल्याचे नागरिकांनी सांगितले. सिंहगड रस्ता भागात तर काही नागरिकांना त्यांनी काठीचे फटकेही दिले आहेत. विशेषतः महिला, तरुणींना अडवून त्यांचा वाहन परवाना, कागदपत्रांची मागणी करणे, त्यांना दमात घेणे यासारखे प्रकार घडतात. पोलिसांकडूनही नागरीकांना योग्य सहकार्य केले जात आहे. परंतु, पोलिस मित्रांच्या दंडुकेशाहीचे खापर थेट पोलिसांवरच फुटू लागल्याची चिन्हे आहेत.

पोलिसमित्रांविरुद्ध नागरिकांचा तक्रारीचा पाढा
पुण्यात पोलिसमित्रांची ‘दादागिरी’


''पोलिसांसमोरच सचिन कर्णिक नावाच्या ‘एसपीओ’ने आमच्या गाडीची चावी काढून घेतली. त्याने आमच्याशी उद्धट वर्तन केले. या प्रकारामुळे आजारी आईही घाबरली होती. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्याला निवेदन दिले. मात्र, त्याबाबत पोलिसांनी पुढे काय केले, हे कळविले नाही.''
- वैभव वाघ

''मी लाइटची कामे करतो, गुरुवारी दुपारी काम संपवून घरी जात होतो. तेव्हा बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप बागेजवळ पोलिस मित्राने गाडी अडविली. त्याला ओळखपत्र दाखवूनही तो दादागिरी करीत होता. माझ्या गाडीची चावी काढून बराच वेळ वाद घालत होता. पोलिस बाजूला असतानाही हा प्रकार सुरू होता.''
- नितीन जाधव

पोलिसमित्रांविरुद्ध नागरिकांचा तक्रारीचा पाढा
पुण्यात रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com