पुण्यात पोलिसमित्रांची ‘दादागिरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पोलिसमित्रांची ‘दादागिरी’

पुण्यात पोलिसमित्रांची ‘दादागिरी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कुठे निघालात ? काय काम आहे? आयडी आहे का ? अशी विचारणा करीत पोलिस मित्र (SPO) थेट नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याचे धक्कादायक अनुभव अत्यावश्‍यक व महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना शहरातील नाकाबंदी ठिकाणांवर (Check Post) येत आहेत. उद्धट वर्तन व काठी उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.(SPOs are behaving rudely to citizens stepping out for important work at Check post in Pune)

संचारबंदीमध्ये पोलिसांना कारवाईत मदत व्हावी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पोलिस मित्रांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, त्यांच्या हद्दीतील तरुणांना नेमण्यात आले. मात्र, सर्वसामान्यांना त्यांचा मोठा त्रास जाणवू लागला आहे.

चेकपोस्टवरील चित्र

  1. पोलिस मित्रांकडून नागरिकांना काठीचा धाक दाखवून अडवले जाते

  2. गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या जातात.

  3. नागरिकांशी उद्धट वर्तन केले जाते.

  4. अरेरावीची भाषा वापरून, दमदाटी केली जाते.

  5. जाब विचारणाऱ्यांवर काठी उगारण्यापासून ते काठीने मारण्यापर्यंत मजल

  6. पोलिस व पोलिस अधिकारीही पोलिस मित्रांना पाठीशी घालत, नागरीकांनाच दोषी ठरवतात.

हेही वाचा: पुण्यात रिक्षाचालकांना उद्यापासून अनुदान

पोलिस मित्रांच्या हाती काठी कशाला?

  1. बहुतांश ठिकाणी टी शर्ट, जीन्स असा, तर काही ठिकाणी साधा पेहराव करून पोलिस मित्रांच्या हातात काठी.

  2. पोलिस नागरिकांशी व्यवस्थित वागत असताना पोलिसमित्रांची काठी मात्र नागरिकांवर चालते.

  3. ओळखपत्र व टी शर्टच्या जोरावर काहींची ‘वसुली' करण्यापर्यंतही मजल.

  4. होतकरु तरुण, सामाजिक कार्यकर्ते यांना नियुक्त करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात टवाळखोर, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच त्यात घुसल्याचे चित्र

हेही वाचा: लसीकरणाचा दुसरा डोस कधी मिळणार यामुळे नागरिक चिंतातूर

पोलिस खुर्ची टाकून निवांत

प्रत्येक चेक पोस्टवर पोलिसदेखील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मित्रांचे कामकाज चालते. मात्र, काही ठिकाणी पोलिस हे खुर्ची टाकून, मोबाईलमध्ये पाहात निवांत बसल्याचे चित्र दिसते तर कारवाईचे काम पोलिस मित्रांकडून केले जात आहे.

''कोणत्याही चेक पोस्टवर केवळ पोलिस मित्रांना नियुक्त केलेले नाही. पोलिस अधिकारी त्यांच्यासोबत असतात. तसेच त्यांना काठी ठेवण्याचे अधिकार नाहीत. त्यांच्याकडून कोणता गैरप्रकार होत आहे का? याची चौकशी करण्यात येईल.''

- डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त.

loading image
go to top