पुण्यात रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी

पुण्यात रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी

पुणे : कोविड रुग्णालयांमध्ये आगीची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या फायर ऑडिटमध्ये ८८ रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. खासगी रुग्णालयांना फायर ऑडिटमधील त्रुटी दूर करण्यासाठी एक ते तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

विरारमधील कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत जीवित हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात फायर ऑडिट करण्यात येत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित रुग्णालयांनी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, याबाबत संबंधित रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: अकरावीची प्रवेश सुरू करणाऱ्या महाविद्यालयांची कानउघडणी

दृष्टिक्षेपात फायर ऑडिट

 • ७३७ सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट

 • त्यापैकी ६४८ रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण

 • उर्वरित ८९ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे

 • पुणे महापालिकेच्या हद्दीतील १९२ रुग्णालयांपैकी ५७, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील १३२ पैकी ९ रुग्णालयांचे फायर ऑडिट प्रलंबित आहे

आढळलेल्या त्रुटी

 • रुग्णालयातून प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग

 • इलेक्ट्रिक वायरिंग धोकादायक

 • वातानुकूलित यंत्रणेचा क्षमतेपेक्षा अधिक वापर

 • फायर एक्सटिंगविशर बंद अवस्थेत

 • बेड वाढल्यामुळे विजेच्या लोडपेक्षा अधिक वापर

 • आग आटोक्यात आणण्यासाठी टाकीत पाण्याची उपलब्धता नसणे

 • प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

 • ऑक्सिजनसह इतर ज्वलनशील पदार्थाची सुरक्षितता

हेही वाचा: लसीसाठी सीरमची भेट, तोडगा नाही

त्रुटी आढळलेली रुग्णालये

गंभीर त्रुटी - ८८

मध्यम त्रुटी - २६९

सामान्य त्रुटी - २९१

''रुग्णालयांना त्रुटी दूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. सरकारी आणि ग्रामीण रुग्णालयांना दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.''

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

हेही वाचा: म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधा, उपचाराचे नियोजन करा ; अजित पवार

Web Title: In Pune District Fire Audit Found Serious Errors In 88

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..