आंबेगावातील नागरिकांसाठी या 19 जणांचा अहवाल ठरलाय... 

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 25 मे 2020

आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर, जवळे, शिनोली, साकोरे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.  

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर, जवळे, शिनोली, साकोरे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगावच्या नागरिकांना दिलासा देणारी गोड बातमी आहे.

भोरमधील आणखी दोघांचे कोरोना अहवाल... 

पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साकोरे येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 104 गावांतील गावकरी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

नारायणगावात कोरोनाबाधिताने केली खरेदी, व्यापाऱ्यांनी घेतला...  

आंबेगाव तालुक्‍यात तीन लॉकडाऊन पूर्ण होईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ग्रामस्थ व प्रशासनाला यश आले होते. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या साथीचे स्वरूप व तीव्रता लक्षात घेऊन दीड महिन्यापूर्वी विलगीकरण कक्ष उभारण्याची सूचना प्रशासनाला दिली होती. त्यानुसार भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल वडगाव काशिंबेग, एमटीडीसी भीमाशंकर भक्तनिवास, पेठ येथील मागासवर्गीय वसतिगृह, आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह येथे 300 बेडची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उभारले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात वीस बेडची क्षमता असलेला कोव्हीड वॉर्ड तयार केला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्‍याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर व जवळे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे दोन्ही गावात प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. गावाच्या चोहोबाजूंनी सीमा बंद केल्या आहेत. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी भेट देवून येथील उपाय योजनांचा आढावा घेतला. गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. जवळे गावात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली जात आहे, असे भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the citizens of Ambegaon taluka, the corona report of these 19 people will be a