थंडीमुळे व्यायामाचा उत्साह; उद्याने, टेकड्यांचे आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

बागा, उद्याने, टेकड्या, विद्यापीठे आणि शैक्षणिक संकुलातील मैदाने, तसेच जॉगिंग ट्रॅकवर व्यायामासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिक पहाटेच्या रम्य वातावरणात व्यायाम आणि योगावर अधिकाधिक भर देत आहेत. 

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील थंडीचे प्रमाण वाढले आहे. बागा, उद्याने, टेकड्या, विद्यापीठे आणि शैक्षणिक संकुलातील मैदाने, तसेच जॉगिंग ट्रॅकवर व्यायामासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिक पहाटेच्या रम्य वातावरणात व्यायाम आणि योगावर अधिकाधिक भर देत आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या वर्षी पावसाळा लांबला होता. हिवाळ्याची सुरुवात झाल्याने शहरात पहाटे धुकेही पडू लागले आहे. सकाळी साडेसातपर्यंत काही भागांमध्ये दाट धुके असते. या पोषक वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याबाबत नागरिक सतर्क झाले आहेत. भल्या पहाटे, थंड हवेत पुणेकर व्यायाम, योगासन आणि पर्यटनासाठी कुटुंबासह घराबाहेर पडत आहेत. ज्येष्ठांसह तरुणाईही शहरातील उद्यानात आणि जॉगिंग ट्रॅकवर व्यायाम करत असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are crowded for exercise on the jogging track

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: