Kondhwa News : कोंढव्यात ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त; चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

कोंढवा बुद्रुकमधील कोढवा-सासवड रस्त्यावर येसाजी कामठे चौकानजीक ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.
drainage water problem in Kondhwa
drainage water problem in Kondhwasakal

कोंढवा - कोंढवा बुद्रुकमधील कोढवा-सासवड रस्त्यावर येसाजी कामठे चौकानजीक ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. हा कोंढवा परिसरातील मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे परिसरातील आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मागील १५ दिवसांपासून रस्त्यावर पाणी वाहत असून प्रशासनाने याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत हे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून संडासाचे पाणी रस्त्यांवर येत असेल तर या ठिकाणांवरून जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ड्रेनेजचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर वाहत असून पाण्याने संपूर्ण रस्ता व्यापला आहे. ड्रेनेजचे हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यांवर येत असताना वाहनांचीही रस्त्यावरून ये-जा असते. त्यामुळे तेच पाणी दुसऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर परसरली आहे.

या चेंबरमधून पाणी वर येऊन त्यामधून संडासाची घाणही येते आणि ती रस्त्यांवर साचते. महापालिकेककडून केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी दुरुस्ती करुन दिलासा द्यावा, अशी मागणी नागिरकांतून करण्यात येत आहे.

या ठिकाणांवरून विजवाहिनी गेली असल्याने खोदकाम करताना अडचणी येत आहेत. तसेच, रात्रीच्यावेळी काम करणे शक्य नसल्याने विजपुरवठा खंडित करुन दिवसा काम करावे लागणार असल्याने वेळ लागत असल्याचे ड्रेनेज विभागाचे शाखा अभियंता नरेश शिंगटे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

प्रशानाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. कोणतेही काम व्यवस्थित आणि दूरदृष्टी ठेवून करण्यात येत नाही. प्रशासनाचे हे अपयश आहे. आतातरी यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा.

- अमोल धर्मावत, स्थानिक नागरिक

याठिकाणी असलेली ड्रेनेजची लाईन ही जुनी आहे. त्यामुळे त्याची क्षमता कमी पडत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. मात्र, आता मुख्य खात्याकडून या कामासाठी निधी आला आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया राबवून मोठ्या व्यासाची लाईन टाकण्यात येईल. तसेच, नवीन लाईन टाकण्याचे काम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपाची दुरुस्ती करण्यात येईल.

- डॉ. ज्योती धोत्रे, सहायक आयुक्त, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com