esakal | सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री; ऐन सणासुदीत फूल खातायेत भाव
sakal

बोलून बातमी शोधा

flower11.jpg

गणेश उत्सव या आनंदाच्या सणांत हार व फुलांच्या विक्रीचा दर वाढल्याने सामान्य नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत.

सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री; ऐन सणासुदीत फूल खातायेत भाव

sakal_logo
By
सुषमा पाटील

रामवाडी (पुणे) : गणेश उत्सव या आनंदाच्या सणांत हार व फुलांच्या विक्रीचा दर वाढल्याने सामान्य नागरिक मात्र हवालदिल झाले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. या वर्षी हार फुलांची दुप्पट दराने विक्री होत असल्याने आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी लागणारी फुले- हार घेताना नागरिकांचे अर्थिक बजेट मात्र कोलमडत असल्याची भावना काही नागरिक व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणपती बाप्पानंतर तीन दिवसांने येणाऱ्या गौराईचे आज घरोघरी आगमन झाले. गौराईच्या पुजेसाठी हार फुले वेणी आदींना मागणी अधिक असते. पण यावर्षी हार फुलांचे दर खुपच वाढल्याने या वर्षी गणेश भक्तांनाकडून कमीत कमी फुलांचा वापर केला जात आहे. प्रतिकिलो दर  -झेंडू  250 ते 300 रु, गुलछडी 400 ते 500 रु, शेवंती 300 ते  400 रु असा दर मार्केटयार्डच्या फूल बाजारात आहे. जाण्या येण्याचा वाहतुकीचा खर्च,  कारागिरांचा   पगार, हा सर्व खर्च पाहून हार फुलांच्या विक्रीचा दर ठरवला जातो असे फूल विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तर सण साजरा करताना अर्थिक बजेटचा विचार करावा लागत असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे.  

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

यावर्षी पावसानं फूल भिजली असल्याने आवक जास्त झाली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेने फुलांचा दर दुपटीने वाढला आहे. मार्केटयार्ड वरून फुले आणतो. ना नफा ना तोटा या तत्त्वाने सध्या मी हार फुलांची विक्री करतो.

-पांडूरंग वाडेकर, हार फुल विक्रेते,  चंदननगर  

फुलांचा दर वाढल्याने गणपती व गौराईच्या पुजेसाठी अर्धा किलो फुले घेत होते. ती सध्या पावशेर घेते. या वर्षी मी कमीत कमी फुलांचा वापर करून सण साजरा करत आहे.

-कोमल कुलकर्णी 

loading image
go to top