बेफिकीर बारामतीकरच करतात अनेक ठिकाणी अस्वच्छता

baramati
baramati

बारामती (पुणे) : एकीकडे स्वच्छतेसाठी रात्रीचा दिवस करणारे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आणि दुसरीकडे त्यांच्या मेहनतीवर आणि कष्टावर सहजतेने रस्त्यावर कचरा टाकून पाणी फिरविणारे बेफिकीर बारामतीकर... असे चित्र सध्या जागोजागी दिसत आहे. 

बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात दररोज कचरा संकलनासाठी नियमितपणे घंटागाड्या फिरविल्या जातात. ठरवून दिलेल्या वेळेत या घंटागाड्या शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करतात, दुसरीकडे बारामती नगरपालिकेच्या प्रशासन व नगरसेवकांकडूनही कचरा समस्या दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असतात. 

या सर्वांच्याच प्रयत्नावर अनेक बारामतीकर अगदी सहजतेने जागोजागी मन मानेल तशा पद्धतीने कचरा टाकून पाणी फिरवितात. एकीकडे स्वतःच मन मानेल तसा आणि मनाला येईल तेथे कचरा टाकून द्यायचा आणि दुसरीकडे नगरपालिकेचे स्वच्छतेकडे लक्षच नाही अशी ओरड करायची, अशी सध्या पद्धत सुरु आहे. 

बारामती बसस्थानकानजिक सातत्याने कचरा साचत होता, त्यासाठी स्थानिक नगरसेवक व काही नागरिकांनी त्या ठिकाणी विश्रांतीगृह उभारले, मात्र तरिही काही बहाद्दर नागरिक अजूनही बसस्थानकाच्या दारातच कचरा सर्रास फेकून अस्वच्छता निर्माण करतात. कचरा उचलला की दुस-या दिवशी पुन्हा तेथे कचरा आणून टाकलेला असतो. बेफिकीर नागरिकांकडूनच ही अस्वच्छता केली जात आहे. 

दंडात्मक कारवाईस प्रारंभ नाहीच...
एकीकडे अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार शासनानेच आता नगरपालिकांना देऊनही अद्याप कोणावरही ना आरोग्य निरिक्षकांनी ना मुख्याधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे नागरिक कचरा टाकताना आढळतील, त्यांच्यावर अशी कारवाई सुरु झाल्याशिवाय अस्वच्छता दूर होणार नाही अशी भावना काही सजग नागरिकांनी बोलून दाखविली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com